Maharashtra Budget 2023 : सायबर गुन्ह्यांसाठी सुरक्षा प्रकल्प उभरणार; राज्याच्या सुरक्षेत मोठी वाढ

Maharashtra Budget 2023 : सायबर गुन्ह्यांसाठी सुरक्षा प्रकल्प उभरणार; राज्याच्या सुरक्षेत मोठी वाढ

Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकारचे (Shinde Fadnavis Govt) पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

या अर्थसंकल्पात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येणार असे फडणवीसांनी म्हटले आहे. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ

तसेच 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट तयार करण्यात येणार आहे. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही टप्पा-2 राबविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यात दोन नवीन कारागृह बांधण्यात येणार आहे. तसेच देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह उभारण्यात येणार आहे.  तसेच राज्यातील 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये करण्यात येणार आहे.

500 कोटींचा घोटाळा दडपण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव; अजितदादांचा गंभीर आरोप

दरम्यान मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये इतके वाढवण्यात येणार आहे. अंगणवाडी, याशिवाय मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरली जाणार असून, यामुळे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असून, अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली राबविली जाणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube