Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असून, यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक तरतुदींसह विविध घोषणा केल्या आहेत. यामुळे राज्याचा विकास अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे.
वाचा : Maharashtra Budget 2023 : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
दरम्यान, अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये, गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Budget 2023 : शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने मदत; फडणवीसांची घोषणा
तसेच, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये इतके वाढवण्यात येणार आहे. अंगणवाडी, याशिवाय मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरली जाणार असून, यामुळे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असून, अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली राबविली जाणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.