Maharashtra Budget 2023 : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2023 : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget)अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानसभेत मांडत आहेत. त्यामध्ये विविध घोषणांचा पाऊस पडत आहे. त्यातच यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेकाला (Shivrajyabhishek)350 वर्ष होत आहेत. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आता शिवप्रेमींकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.

शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीसांनी 350 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Maharashtra Budget 2023 : शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने मदत; फडणवीसांची घोषणा

मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने तयार केली जाणार आहेत. त्यासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय आणि शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळं आता यंदाचं शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचं औचित्य साधून त्यासाठी यंदा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube