ठाणे : माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु असून ठाणे महानगरपालिका निवडणुक काळात मला जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा दावा केला आहे.
आव्हाड म्हणाले, ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत मला आतमध्ये ठेवलं जावू शकतं. केंद्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला तसं सांगितलं आहे. माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही. तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, अशी भविष्यवाणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तसेच हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला खरा मात्र, त्यासंबंधीचा कायदा आणण्यासाठी सरकारला कुणीही रोखलेलं नाही. हिंदू मुलींनाच धमक्या देणं योग्य नसल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.
तसेच राज्यावर साडेसहा लाखांपेक्षा अधिक कर्ज असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढही होत आहे. राज्याची अर्थिक स्थिती ठीक नसून कधीही राज्यात दिवाळखोरी येणार असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
दरम्यान, सत्ताधारी सरकारवर सातत्याने कोणत्या ना आरोप-प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार जितेंद्र आव्हाडांनी असा आरोप केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.