IAS Mahesh Zagade’s X post sparks discussion : राज्यातील प्रशासकीय वर्तुळात सध्या एका एक्स पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी एफडीए आयुक्त आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी महेश झगडे यांनी केलेल्या एका सूचक पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असताना झगडे यांची ही पोस्ट समोर आल्याने तिचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. झगडे यांनी कुणाचे देखील नाव घेतले नसले, तरी त्यांच्या पोस्टमधील संदेश आणि सध्या घडत असलेल्या घडामोडी यांची सांगड घालत अनेकांनी ही पोस्ट तुकाराम मुंढे यांना उद्देशून असल्याची चर्चा करत आहेत.
टीव्ही सुरू केला. वर्तमानपत्र उघडले किंवा समाजमाध्यमांवर नजर टाकली की गेल्या एक-दोन आठवड्यांपासून प्रसिद्ध हिंदी कवी दृश्यांत कुमार यांच्या कविता प्रकर्षाने आठवत असल्याचे महेश झगडे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. दृश्यांत कुमार यांच्या सिर्फ हंगाम खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है ये सुरत बदलनी चाहिये या गाजलेल्या ओळींचा उच्चार करत झगडे यांनी केवळ गदारोळ निर्माण करणे आणि खरा बदल घडवून आणणे यामधील फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
टी व्ही सुरू केला
वर्तमानपत्र उघडले
समाजमाध्यमावर नजर टाकली
की
गेले एक दोन आठवडे
प्रसिद्ध हिंदी कवि दुष्यंत कुमार यांच्या
कवितेतील खालील ओळी प्रकर्षाने आठवतात“सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिएI”…पण दुर्दैवाने “हंगामा” हेच…
— Mahesh Zagade, IASx (@MaheshZagade07) June 6, 2026
झगडे पुढे म्हणतात की, दुर्दैवाने आज हंगाम हेच सत्य असल्याचा गैरसमज जनतेत निर्माण होत आहे. परिस्थिती बदलण्याच्या मूळ उद्दिष्टापेक्षा चर्चांचा गदारोळ सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि प्रसिद्धी यांनाच अधिक महत्व दिले जात आहे. काही काळ गोंधळ निर्माण होतो, त्यातून काहींना प्रसिद्धी मिळते, ब्राउनी पॉईंट्स मात्र या गदारोळात सत्य हरवतं आणि नंतर तेच लोक पुन्हा हणून समोर येतात, असे सूचक भाष्य त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलं आहे.
इतिहास पुसून टाकता येत नाही, नेहरूंचे योगदान अतुलनीय, मोदी-नेहरू तुलना वादावर शरद पवारांचे स्पष्ट मत
महेश झगडे हे राज्यातील कठोर आणि परिणामकारक प्रशासक म्हणून ओळखले जातात. एफडीए आयुक्त म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते आणि त्यांच्या कार्यशैली देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टकडे प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय वर्तुळ गांभीर्याने पाहत असतात.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची भूमिका, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांवरून राज्यभर चर्चा सुरू आहे. मुंढे हे देखील त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, आक्रमक प्रशासनशैली आणि चर्चेत राहणाऱ्या निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यामुळे झगडे यांच्या पोस्टचा संदर्भ मुंढे यांच्याशी जोडला जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मात्र या संपूर्ण पोस्टमध्ये झगडे यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे ही पोस्ट तुकाराम मुंढे यांच्यासाठीच होती, असा ठोस दावा करता येत नसला तरी सोशल मीडियावर आणि प्रशासकीय वर्तुळात मात्र त्याच संदर्भाने चर्चा रंगली आहे. झगडे यांना नेमके काय सांगायचे होते, त्यांनी कोणत्या घडामोडींवर भाष्य केले होते आणि त्यांच्या या संदेशामागचा खरा आशय काय होता, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
एक मात्र नक्की, दुष्यंत कुमार यांच्या कवितेतील ओळींचा आधार घेत महेश झगडे यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा केवळ व्यक्तींविषयी नसून, गदारोळ आणि प्रत्यक्ष परिवर्तन यामधील फरक अधोरेखित करणारा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या या पोस्टची चर्चा आता राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
