Download App

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी मतभेद भोवले, सचिव व्ही राधा यांची तातडीने बदली

राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Maharashtra News : राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. व्ही. राधा यांनी अगदी दोन महिन्यांपूर्वीच या पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर लगेचच त्यांची बदली करण्यात आली आहे. फक्त दोन महिन्यांत बदली का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या बदलीला कृषिमंत्री धनंजच मुंडे यांच्याबरोबरील मतभेदाची किनार असल्याचे बोलले जात आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि व्ही. राधा यांच्यात कृषी निविष्ठा वितरण प्रस्तावावरून मतभेद झाले होते. याच कारणामुळे व्ही. राधा यांची बदली झाल्याचे सांगितले जात आहे. राधा यांच्या जागी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘केज’साठी पवारांनी हेरला मुंडेंचाच शिलेदार; प्रवेशाची औपचारिकता बाकी?

कृषी विभागाकडून प्रस्तावित असलेल्या कृषी निविष्ठ वितरणाच्या प्रस्तावावरून मंत्री मुंडे आणि व्ही. राधा यांच्यात मतभेद झाले होते. नॅनो युरिया आणि नॅनो डिएपी वितरणाला राधा यांचा विरोध होता. परंतु, ही प्रक्रिया टेंडर काढून राबवण्यात येणार असूनही चुकीच्या पद्धतीने विरोध होत असल्याचे मुंडे यांचे म्हणणे होते. या मतभेदांनंतर व्ही. राधा यांची लवकरच बदली होईल अशी चर्चा होती. आता ही चर्चा खरी ठरली आहे. राज्य सरकारने फक्त दोन महिन्यांतच त्यांची बदली केली आहे. व्ही. राधा आता सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

व्ही. राधा यांनी कापूस, सोयाबीन आणि तेलबिया मूल्यसाखळी विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या नॅनो युरिया डिएपी आणि फवारणी पंपांच्या वितरणाला स्थगिती दिली होती. या आदेशामुळे वितरण ठप्प झाले होते. तब्बल 67 हजार पंप गोदामात धूळखात पडून  होते. स्थगिती दिल्याचे आदेश तोंडी होते. यावरूनही कृषी मंत्राल आणि सचिव कार्यालयात वाद झाले होते. व्ही. राधा यांची बदली झाल्यानंतर राजगोपाल देवरा यांनी तत्काळ कृषी अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारावा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

जयंत पाटलांच्या वक्तव्याने मोठी खळबळ; म्हणाले, धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी 

follow us