Download App

सोहळा फडणवीसांप्रती पण कर्डिलेंनी अजित पवारांनाच धुतलं…

अहमदनगर : आगामी काळात भाजपचं सरकार आलं नाही तर महाविकास आघाडी सरकार साकळाई योजनेचं चालू काम बंद पाडणार असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. राष्ट्रवादीने साकळाईला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता पण मंजुरी तर लांबच पण अजित पवार पाणी परिषदेलाही उपस्थित राहिले नसल्याचं शिवाजी कर्डिलेंनी यावेळी सांगितलं आहे.

श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन रुईछत्तीशी इथं करण्यात आलं. यावेळी शिवाजी कर्डिले बोलत होते.

कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेत गाजलं! नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा

पुढे बोलताना शिवाजी कर्डिले म्हणाले, आमदार असताना माझ्या मतदारसंघात श्रीगोंदा भागातील गावांचा समावेश होता. साकळाई योजनेसाठी जिल्ह्यात अनेक आंदोलने, मोर्चे झाले. लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नव्हता. मागील अनेक वर्षांपासून साकळाई योजनेची मंजुरी रखडली असल्याचं ते म्हणाले.

तसेच आमदार असताना मी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने साकळाई योजनेला मंजुरी देण्याबाबत मला सांगितल्याचं शिवाजी कर्डिलेंनी यावेळी स्पष्ट केलंय. त्यानंतर मी अनेकदा पाणी परिषदा घेतल्या. दिलीप वळसेपाटील त्यावेळी पालकमंत्री होते. राष्ट्रवादीकडून योजनेची मंजुरी तर लांबच पण पाणी परिषदेलाही अजित पवार उपस्थित राहु शकत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल, दोघांना डच्चू

महाविकास आघाडीच्या काळात साकळाईला मंजुरी मिळत नव्हती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कृपेने राज्यात भाजपचं सरकार आलं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साकळाई योजनेला मंजुरी दिल्याचं कर्डिले यांनी सांगितलं आहे. फडणवीसांनी मंजुरी दिल्यानंतर तत्काळ साकळाईच्या सर्वेक्षणासाठी 2 कोटी रुपयांचा निधीही त्यांनी दिल्याचं सांगितलं आहे.

साकळाईच्या मंजुरीसाठी खासदार सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुतेंनी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत. या सर्व नेत्यांच्या माध्यमातूनच मंजुरी मिळाल्याबद्दल कर्डिलेंनी सर्वच नेत्यांचे आभार मानले आहेत.

भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट ! राणेंनी दिली होती ऑफर पण, मी…

या कृतज्ञता सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं असून फडणवीसांचा सत्कार करु न शकल्याने शिवाजी कर्डिलेंनी याबद्दल दिलगिरीही व्यक्त केलीय.

यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, वैभव पिचड, अरुण मुंडे, यांच्यासह अऩेक भाजपचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags

follow us