Download App

Neelam Gorhe : ‘बाळाला घ्या नाही तर गुवाहाटीला घेऊन जातील’, गोऱ्हेंचा सावंतांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) आमदार सरोज अहिरे ( Saroj Ahire ) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे या आपल्या बाळाची तब्येत बरी नसताना देखील सभागृहात आल्या होत्या. काल माध्यमांसमोर बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी फोनवर अहिरे यांच्याशी संवाद साधत हिरकणी लक्ष चांगला करुन देणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा आज हिरकणी कक्ष सुस्थितीत करुन दिला.

त्यानंतर आज हिरकणी कक्षात आमदार सरोज अहिरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत ही मंडळी आली होती.  यावेळी तानाजी सावंत यांनी अहिरे यांच्या बाळाला कडेवर घेतले होते. तेव्हा नीलम गोऱ्हे यांनी सावंतांना मिश्किल टोला लगावला. बाळाला घ्या नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील, असे त्या म्हणाल्या. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावर सावंतांनी देखील तितकेच खुमासदार उत्तर दिले आहे. आम्ही बाळासह तुम्हालाही घेऊन जावू. सर्वांनीच देवदर्शन करायला पाहिजे. देवदर्शन केल्यामुळेच आजे हे काम तुम्हाला दिसते आहे, असे मिश्किल प्रत्युत्तर त्यांनी गोऱ्हे यांना दिली. दरम्यान हिरकणी कक्षामध्ये चांगली व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याबद्दल अहिरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. यावेळी राज्यात ज्या ठिकाणी महिला काम करतात त्याठिकाणी हिरकणी कक्ष उभारणार असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.

(Mangaldas Bandal अजित पवारांनी मला टायरमध्ये घालण्याची धमकी दिली!)

follow us