Download App

समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने टप्पा होणार खुला! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

Samruddhi Highway च्या उर्वरित टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Igatpuri to Aamne section of Samruddhi Highway will be opened! Devendra Fadnavis will inaugurate it : विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सह राज्यातील 24 जिल्ह्यांना जोडणाऱ्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने हे टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

उद्धव ठाकेर यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का; पाच ते सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

या अगोदर नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 ला पार पडलं होतं. त्यानंतर या महामार्गाचे दुसरा टप्प्याचं लोकार्पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरविर इंटरचेंज दरम्यानच्या 80 किलोमीटर लांबीचे लोकार्पण 26 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच 2024 च्या मार्चमध्ये भरविर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंत 25 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडलं होतं.

नव्या बदलांसह साकारणार अनुपमा, रूपाली गांगुली नेमकं काय म्हणाली?

त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या 701 किलोमीटर पैकी 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे यामध्ये आतापर्यंत तब्बल दोन कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे समृद्धी महामार्गाचा उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने हे टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

हिना खान रॉकी जयस्वालसोबत विवाहबद्ध; खास फोटो शेअर करत दिली गुडन्युज!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकात्मिक नियोजन आणि पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकत्रित अंमलबजावणीचा समर्थन करणारा हा महामार्ग दिल्ली मुंबई त्रुतर्गती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणार आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे कृषी पर्यटन दळणवळण उद्योग इत्यादी क्षेत्र विकसित होऊन लघु उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर या महामार्गामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरला आहे तर महाराष्ट्रासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषे ठरणार आहे.

follow us