हिना खान रॉकी जयस्वालसोबत विवाहबद्ध; खास फोटो शेअर करत दिली गुडन्युज!

- अभिनेत्री हिना खान हिला नुकतंच तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं आहे.
- या आजाराला ती धाडसाने तोंड देत असतानाच आता तिच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा पर्व सुरू झालं आहे.
- कारण ती आता गेल्या कित्येक वर्षांपासून तिचा बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वाल याच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे.
- तिने तिच्या या विवाहाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- हिना खाने रजिस्टर पद्धतीने हा विवाह केला.
- तर या लग्नाची माहिती देताना हिना खाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिला आहे की,
- दोन वेगळ्या जगातून आम्ही आता आमचं जग निर्माण केलं आहे.
- आमच्यातील सगळे मतभेद नष्ट झाले असून आमची ह्रदय जुळली आहेत.
- ज्यामुळे एक असं नातं तयार झालं आहे. जे जीवनभर कायम राहील.
- आम्ही आमचं घर, आमची स्वप्न आणि आमचे संकट सगळं सगळ्याला एकत्र सामोरे जाऊ.
- आज आमचं प्रेम कायदेशीर पद्धतीने बांधलं गेलं आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या आशीर्वाद पती-पत्नी म्हणून कायम मिळो. असं म्हणत हिना खानेने तिच्या चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे