साहिल वाकोडे प्रकरणात आयआयटी बॉम्बेने मागितली माफी, म्हणाले त्याच्या कॉपीबद्दल तपासापूर्वी सांगणे…

IIT Student Sahil Wakode case मध्ये अखेर आयआयटी बॉम्बेने माफी मागितली आहे. त्यांनी साहिलने कॉपी केल्याच्या आरोपांवर ही माफी मागितली आहे.

IIT Student Sahil Wakode Case

IIT Student Sahil Wakode Case

IIT Student Sahil Wakode case IIT Bombay apologizes said He had not cheated : मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणामध्ये अखेर आयआयटी बॉम्बेने माफी मागितली आहे. त्यांनी साहिलने कॉपी केल्याच्या आरोपांवर ही माफी मागितली आहे. तसेच या प्रकरणावर संबंधितांवर गु्न्हा दाखल करण्यात आला असून प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

जरांगेंना मोठा धक्का; सहकारी, नातेवाईकांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी होणार

आयआयटी बॉम्बेने म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास होण्याअगोदरच दावा करण्यात आला होता की, साहिलने परीक्षेत कॉपी केली त्यातूनच त्याने आपलं जीवन संपवलं. मात्र यानंतर विद्यार्थी आणि साहिलच्या कुटुंबाने त्याच्या वरील कॉपीचा आरोप चुकीच असल्याचं म्हटलं. तसेच त्याचा छळ झाल्याचा देखील आरोप केला गेला. मात्र यावर आता आयआयटी बॉम्बेने माफी मागितली आहे. मात्र त्यांनी साहिलला परीक्षा खोलीत मोबाईलसह पकडल्याचे नाकरलेले नाही.

निवेदन नेमकं काय?

साहिलच्या दुर्दैवी निधनाच्या परिस्थितीबाबत आमच्या यापूर्वीच्या निवेदनात करण्यात आलेल्या वक्तव्यांबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या घटनेपूर्वी नेमके काय घडले आणि त्यामागील परिस्थिती काय होती, याबाबतची माहिती संबंधित सक्षम यंत्रणांकडून सुरू असलेल्या चौकशीच्या अधीन आहे.चौकशी अद्याप सुरू असताना, योग्य तपास प्रक्रियेतून या बाबी अधिकृतपणे स्पष्ट होण्यापूर्वीच घटनेपूर्वीच्या घटनांशी संबंधित तपशील मांडणे किंवा त्याबाबत कोणतेही निष्कर्ष व्यक्त करणे योग्य नव्हते.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याने त्याचं जीवन संपवलं. साहिल हा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. शुक्रवारी (18 सप्टेंबर) त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर करताना तो पकडला गेल्याच्या काही तासांनंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर साहिले कॉपी केली नसल्याचा देखील दावा केला जात आहे.

जरांगेंना मोठा धक्का; सहकारी, नातेवाईकांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी होणार

दुसरीकडे वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अखेर मुंबईतील आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रविवारी या प्रकरणी या प्राध्यापकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. साहिलच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे.

Exit mobile version