‘त्या’ 15 मिनिटांत काय घडलं? CCTV फुटेजने समोर आणलं साहिल वाकोडे प्रकरणाचं सत्य

IIT Student Sahil Wakode case मध्ये धक्कादायक वास्तर समोर आले आहे. ते म्हणजे या घटनेच्या दरम्यानते 15 मिनिटांचे एक CCTV फुटेज समोर आले आहे.

Professor Finally Suspended

CCTV footage reveals truth behind IIT Student Sahil Wakode case : मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणामध्ये एक धक्कादायक वास्तर समोर आले आहे. ते म्हणजे या घटनेच्या दरम्यानते 15 मिनिटांचे एक CCTV फुटेज समोर आले आहे. त्यातून नेमकं काय घडलं? हे समोर आलं आहे.

महाराष्ट्र समान नागरी कायदा समितीला धक्का! ‘या’ कारणामुळे निवृत्त न्यायमूर्ती आर सी चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा

या प्रकरणामध्ये आता आयआयटी बॉम्बेच्या वर्गातील तसेच लॉबीतील दुपारी 12.30 ते 12.45 या वेळेतील CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये दिसत आहे की, साहिल विद्यार्थ्यांसोबत पोपर लिहित होता. पण 12.30 ला तो त्याच्या खिशातील वस्तूकडे पाहत आहे. ती वस्तू म्हणजे फोन होता तसेच तो कॉपीसाठी चॅट जीपीटीचा वपार करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

साहिल वाकोडे प्रकरणानंतर IIT मुंबईचा निर्णय; सिलिंग फॅन हटवणार, वॉल-माऊंटेड फॅन बसवणार

यावेळी या वर्गावर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला हे पर्यवेक्षक होते. त्यांना हा प्रकार दिसला असता त्यांनी त्याल वर्गाच्या बाहेर काढलं. परीक्षेचा वेळ संपण्याच्या काही वेळ अगोदरचा हा प्रकर होता. त्यानंतर तो रागात होस्टेलमध्ये गेला हे देखील सीसीटीव्हिमध्ये कैद झालं आहे. तसेच तो 1.25 ला त्याच्या खोलीस पोहचल्याचं देखील यामध्ये दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याने त्याचं जीवन संपवलं. साहिल हा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. शुक्रवारी (18 सप्टेंबर) त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर करताना तो पकडला गेल्याच्या काही तासांनंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर साहिले कॉपी केली नसल्याचा देखील दावा केला जात आहे.

राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या तयारीत श्वेता महाले; ऐनवेळी निर्णय फिरला, म्हणाल्या, ‘बरं झालं!’

दुसरीकडे वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अखेर मुंबईतील आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रविवारी या प्रकरणी या प्राध्यापकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. साहिलच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे.

follow us