अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे (Mundhe) यांच्या कारवाईचा तडाखा सुरूच असून भिवंडीत अधिकाऱ्यांनी मुदतबाह्य पिठाचा नऊ टन साठा जप्त केला आहे. निजामपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ५ लाख १८ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध पथकातील सहाय्यक आयुक्त संतोष सरोसिया, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर, प्रवीण शिंदे, अर्शद सय्यद यांना भिवंडीत एका ट्रकमधून मुदतबाह्य पिठाचा साठा गुजरात भूज येथील व्यापारी विनोद भानुशाली यांना विक्रीसाठी पाठवला जाणार आहे अशी खबर मिळाली होती. याची गंभीर दाखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे व त्यांच्या पथकाने संशयित ट्रक अडवला.
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका ! नागपूरमधील बड्या हॉस्पिटलच्या मेडिकलमधून 20 लाखांचा औषधसाठा जप्त
याप्रकरणी ट्रकचालक फारुक जुसब खलीफा व दलाल फरहान मुकीम अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न-औषध पथकातील सहाय्यक आयुक्त संतोष सरोसिया आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांना भिवंडीत एका ट्रकमधून मुदतबाह्य पिठाचा साठा गुजरात भुज येथील व्यापाऱ्याकडं विक्री साठी पाठवला जाणार आहे, अशी खबर मिळाली होती.
या पथकासह निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित ट्रक आला असता त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रक मध्ये विविध कंपनीच्या नावाचा नऊ टन वजनाचा मुदतबाह्य झालेला शिवाय पॅकेज फुटलेला पिठाचा साठा पुन्हा बाजारात विक्री करीता आणण्यासाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे.
