IMD Rain Alert: दिवसेंदिवस राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं चित्र आहे. नागरिकांना कधी थंडा जाणवते, तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. येत्या ४ ते ५ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
राज्यातील 15 लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार, बावनकुळेंची घोषणा
ऐन हिवाळ्यात काल राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला. नाशिक, धुळे, अहमदनगर, नवी मुंबई अशा अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अनेक भागात गारपिट झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागानेही काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा दिला. शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांना गारपिटीपासून वाचवण्यासाठी काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
मनमाड-येवला महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, पाच जण जागीच ठार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, बीड, सातारा जिल्ह्यांत अवकाळी हवामानाचा अंदाज आहे. त्याचबरोबर नगर, पुणे, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. वाशिम, यवतमाळ मध्ये यलो अलर्ट देण्यात आल.
मुंबईतही पावसाचा इशारा
रविवारी मुंबईसह उपनगरात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत उकाडा जाणवत होता. या पावसामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन दिवसा मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्यानं सांगतिलं.
एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला कोणताही धोका नाही.