IMD Rain Alert : जुन महिन्यानंतर राज्यातून गायब झालेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवमान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक भागांसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी काही जिल्ह्यांना रेड (Red Alert) तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस होताना दिसत आहे. मात्र पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. बंगालच्या खाडीत कमी दबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसात पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
पूर्व विदर्भात पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याने भारतीय हवामान विभागाने 25 जुलैला चंद्रपूर, भंडारा (Bhandara), गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर 26 जुलैला भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानत बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
तमन्ना भाटियाने इंटरनेटवर केला धुमाकूळ, इंडिया कुट्युर वीकच्या रॅम्पवर खास अदा
तर दुसरीकडे 27 जुलैनंतर पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.