वर्धा, नागपूर, भंडारासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

वर्धा, नागपूर, भंडारासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra Yellow Alert : पुन्हा एकादा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण (Konkan) , विदर्भ (Vidarbha) , मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) काही भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

काही दिवसांपूर्वी राज्यात मान्सूनची एंट्री झाली आहे. त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

धनंजय मुंडे प्रकरण, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांची चौकशी होणार; कारण काय? 

तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि कल्याणसह सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान अंशतः ढगाळ आहे परंतू उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

TikTok Star Sana Yousuf : मोठी बातमी! टिकटॉक स्टार सना युसूफची घरात घुसून हत्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube