धनंजय मुंडे प्रकरण, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांची चौकशी होणार; कारण काय?

Anjali Damania : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडे राज्याचे कृषिमंत्री असताना त्यांनी 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. तर आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणात पुरावे सादर करणार असं देखील म्हणाल्या होत्या. त्यामुळे आता या प्रकरणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंजली दमालिया यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना अंजली दमानिया यांनी लाचलुचपत विभागाला पत्र लिहून तक्रार दिली होती. त्यामुळे आता या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात अंजली दमानिया यांना पत्र पाठवण्यात आला आहे. तसेच जर अंजली दमानिया चौकशीसाठी हजर राहिल्या नाही तर त्यांचे या प्रकरणात काहीही म्हणणं नाही असे समजून हा अर्ज दप्तरी दाखल करण्यात येणार असं देखील लाचपुत विभागाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रकरण काय?
धनंजय मुंडे राज्याचे कृषिमंत्री असताना मंत्रिमंडाळाच्या परवानगीविना धनंजय मुंडे यांनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. राज्याच महाविकास आघाडीचे सरकार असताना 2022 मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीव आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून एक योजना सुरु करण्यात आली होती.
TikTok Star Sana Yousuf : मोठी बातमी! टिकटॉक स्टार सना युसूफची घरात घुसून हत्या
याच योजनेतील नियमांचं उल्लघन करत मुंडेंनी कृषिमंत्र्याच्या कार्यकाळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. तसेच या प्रकरणात पुरावे देखील देणार असं देखील अंजली दमानिया म्हणाले होत्या.