पावसाचा जोर कायम राहणार; मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

पावसाचा जोर कायम राहणार; मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : मॉन्सूनच्या पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (ता. २८) कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची (Rain) शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे. विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. छत्तीसगडपासून आग्नेय राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झालेला आहे.

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा; नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश

काल रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता दक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबईसह पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पाऊस झालाआहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने चाल करत सोमवारी (दि.२६) मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिवपर्यंत धाव घेतली. मंगळवारी (दि. २८) मॉन्सूनने प्रगती केली नाही. वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भाग, तसेच सिक्कीम, पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube