IMD Rain Alert : कोल्हापूर, धाराशिव, नांदेडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज धो धो पावसाची शक्यता ; अलर्ट जारी

IMD Rain Alert : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असून पुढील काही तासांमध्ये राज्यातील

IMD Rain Alert

IMD Rain Alert

IMD Rain Alert : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असून पुढील काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 20 तासांमध्ये महाराष्ट्रासह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणे ताशी 75 किलोमीटर वेगाचे वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे धुळे, नंदुरबार, नाशिक घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर बहुतांश भागात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तर 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

देशातच तयार होणार सुखोई आणि टर्बोप्रॉप विमाने ; BRICS शिखर परिषदपूर्वी भारत-रशियामध्ये मोठा करार होणार

तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, धत्तीसगड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, कश्मीर, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आले आहे. 14 सप्टेंबरपासून हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबमधील काही भागांत मुसधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज ‘या’ 4 राशींना मिळणार आर्थिक लाभ ; उत्पन्नातही होणार अनपेक्षित वाढ-

 

Exit mobile version