Download App

यंदा देशात होणार सरासरीच्या 96 टक्के पाऊस; हवामान खात्याने दिली माहिती

Monsoon :  यावर्षी देशामध्ये सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. देशामध्ये यावेळेस सामान्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळेस देशामध्ये 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तसेच सरासरीच्या कमी पाऊस होणार असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

देशामध्ये यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान येणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटले जाते.

Breaking! शिवसेना भवन, निधी प्रमुखांना द्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका…

दरम्यान स्कायमेटने काल यंदाच्या वर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अहवाल देणार्‍या संस्थेने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या अंदाजानुसार पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो.

मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री शिंदेंचे टीकास्त्र

स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची शक्यता केवळ 25% आहे. तर LPA (LPA: दीर्घ कालावधी सरासरी) 94% पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे. सध्या ला निना संपला असून आगामी काळात अल निनोमुळे मान्सून कमी पडण्याची शक्यता आहे.

Tags

follow us