नागपूर : हिवाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी काही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केलीय. यामध्ये विशेषत: जलयुक्त शिवार योजना, सिंचन निर्मिती प्रकल्पाबाबत घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणा?
सुरजागड येथे १४ हजार कोटी व ५ हजार कोटी गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प
अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना 562 कोटी रुपये मंजूर
सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहन पर रक्कम बोनस
विदर्भातील ६ प्रकल्पांना सुधारित मान्यता, या प्रकल्पाच्या ७८७ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव
गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार
समृद्धी महामार्गावरील जिल्ह्यांत विदर्भ-मराठवाडा असे टूरिझम सर्कीट विकसित करणार
बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता
लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी
भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता.
राज्यातील रस्ते विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार
विदर्भातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु
जलयुक्तशिवार अभियान आम्ही देशासमोर आदर्श निर्माण करणारे राहील, असं काम करणार असल्याची घोषणा
आठवी ते दहावी तसेच अकरावी ते बारावी अशा दोन गटांमध्ये मुख्यमंत्री समृद्धी चषक निबंध स्पर्धा घेणार
नागपुरात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण करारनाम्यावर स्वाक्षरी.
पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बॅरेजेसचा वाशिम, हिंगोलीच्या गावांना फायदा होणार
या प्रकल्पाच्या ७८७ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येणार
जिगाव प्रकल्पाला देखील गती देण्यात येणार
जून २०२४ अखेर ४५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार, धान उत्पादकांना होणार फायदा
केंद्र शासनाकडून राज्याला 15 लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजुरी
सोयाबीन पिक नुकसानग्रस्तांसाठी 98.58 कोटी इतका निधी
भंडाऱ्यातील सुरेवाडा उपसा सिंचनासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता
गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होणार
अतिवृष्टीबाधितांसाठी ७५५ कोटी रुपये निधीचं वितरण, तर अमरावती, नागपूर, पुणे विभागातील शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित
दरम्यान, विरोधकांनी विदर्भ मराठवाड्यासाठी सरकारने महत्वाच्या घोषणा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. विधीमंडळात विदर्भाच्या विकसाबाबत आवाज उठवून विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरुन काढावा, अशी जोरदार मागणी केली होती.