Download App

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…महाराष्ट्र ‘SET 2023’ परीक्षेचे प्रवेश पत्र जारी

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेसाठीचे (MH SET 2023) प्रवेशपत्र (Hall Ticket) जारी केले आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आली असून परीक्षार्थी विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. setexam.unipune.ac.in ही अधिकृत वेबसाइट असून या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जाणून घ्या परीक्षा कधी होणार?
MH SET 2023 ची परीक्षा 26 मार्च 2023 रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. तसेच सादर परीक्षा ही दोन सत्रात घेतली जाणार आहे. यामध्ये पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. दुसरे सत्र सकाळी 11.30 ते 1.30 पर्यंत असेल.

जाणून घ्या पेपरचे स्वरूप कसे असणार आहे?
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत दोन पेपर असतील. पहिला पेपर 50 मार्कचा असणार आहे तर दुसरा पेपर 100 मार्कचा असणार आहे. या परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न येतील, ज्यामध्ये चार पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे अनिवार्य आहे.

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, तीसहून अधिकजण…

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
setexam.unipune.ac.in ही वेबसाईट आहे.
होमपेज ओपन झाले की येथील अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमचे लॉगिन तपशील भरा आणि Enter करा.
आता तुमचे प्रवेशपत्र कंप्यूटरवर दिसेल.
तुम्ही प्रवेशपत्र तपासून डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.

उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा त्याच मैदानात…

विशेष टीप : परीक्षेशी संबंधित इतर कोणतीही माहिती अधिकृत मिळविण्यासाठी किंवा तपशील पाहण्यासाठी, फक्त परीक्षा विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Tags

follow us