Download App

एआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नियम मोडून… जलील यांचा मंत्री शिससाटांवर गंभीर आरोप

या कंपनीत मंत्री शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाठ हे दोघेच डायरेक्टर राहिले आहेत.

Imtiaz Jalil on Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोपांवर आरोप सुरूच आहेत. नुकतच हॉटेल प्रकरण गाजलं असताना आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Shirsat) पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलाच्या नावे एमआयडीसीत जागा, जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. येथील जमीन मंत्री शिरसाटांसाठी राखीव ठेवली गेली असं म्हणत Cameo डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीला जागा देण्यात आली. हा प्रोजेक्ट 105 कोटी 89 लाख रुपयाचा आहे. इतके पैसे आले कुठून असा थेट सवाल जलील यांनी केला आहे.

राजकारणाचा खेळ शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..

26 कोटी सिद्धांत शिरसाठ देणार असे अधिकृत कागदावर लिहिलेले आहे. बँक लोन 79 करोड 42 लाख घेणार असे नमूद आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये शिरसाट यांनी ही जागा घेतली आहे. तिथे ते एक लिकर फॅक्टरी, दारू कंपनी उघडणार आहे. या कंपनीसाठी 21 हजार 275 स्क्वेअर मीटर जागा घेतली आहे. जवळपास पाच एकर जागा सिद्धांत शिरसाट यांना देण्यात आली आले. ही जागा त्यांनी 6 कोटी 9 लाख 40 हजार 200 रुपयात विकत घेतली आहे. ही जागा ट्रक टर्मिनल साठी होती. मात्र, डी रिझर्व्ह करून घेण्यात आल्याचाही जलील यांनी आरोप केला आहे.

या कंपनीत मंत्री शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाठ हे दोघेच डायरेक्टर राहिले आहेत. त्यांच्या पत्नीने संचालक होण्यासाठी अधिकृतपणे दोन लाख रुपये भरले आहे. विजया शिरसाट या गृहिणी आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी उत्पन्नाचे साधन बिल्डरशीप, आणि शेतीतून दाखवले आहे. मंत्री कुठली कंत्राट घेतात. एका लोकप्रतिनिधी असताना बिल्डरशिप करतात. शिरसाटांच्या पत्नीचे 25 लाख वार्षिक उत्पन्न असताना युको बँकेने त्यांना 5 कोटी 65 लाख 330 हजार कर्ज दिलं असही जलील म्हणालेत.

follow us