MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; अहिल्यानगरमधून आले पत्र!

Imtiaz Jaleel Receives Death Threat: MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली.

Imtiaz Jaleel Receives Death Threat Letter From Ahilyanagar

Imtiaz Jaleel Receives Death Threat Letter From Ahilyanagar

Imtiaz Jaleel Receives Death Threat Letter From Ahilyanagar: MIM चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर येथून पाठवलेल्या एका पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. या पत्रात जलील यांची हत्या करण्यासाठी एका व्यक्तीची मदत घेतल्याचा उल्लेख असल्याचे समजते.

न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा मोठा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यर गोलंदाजांवर नाराज

धमकीचे पत्र मिळाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित पत्र पोलिसांच्या स्वाधीन करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. केवळ धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यापुरते मर्यादित न राहता, या पत्रामागे नेमका कोणाचा हात आहे आणि हत्येच्या उल्लेखामागे काही कट आहे का, याचाही तपास करावा, अशी त्यांची मागणी आहे.

पत्रात करण्यात आलेल्या उल्लेखांमुळे जलील यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने हे पत्र नेमके कोणत्या उद्देशाने पाठवले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळखही समोर आलेली नाही.

महायुतीतील वादावर एकनाथ शिंदेंनी दिला पूर्णविराम! म्हणाले, ‘मित्रपक्षावर चिखलफेक बंद करा’

दरम्यान, पोलिसांनी या पत्राची दखल घेत तपास सुरू केल्यानंतर धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. पत्रातील मजकूर, त्याचा स्रोत आणि त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तीबाबत तपासातून काय माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version