सत्तेसाठी काहीपण! मालेगामध्ये राजकीय घडामोडींना वेग, शिंदे गट MIM’ची गुप्त बैठक

एमआयएमने महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली असली, तरी उपमहापौरपदासाठी आमदार पुत्र हाफिज अब्दुल्ला यांना रिंगणात उतरवलं आहे.

News Photo   2026 02 06T082911.129

सत्तेसाठी काहीपण! मालेगामध्ये राजकीय घडामोडींना वेग, शिंदे गट MIM'ची गुप्त बैठक

महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक उद्या होत आहे. (Election) या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मालेगावमध्ये माजी महापौर, एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. या भेटीत महापौर-उपमहापौर निवडीची रणनीती निश्चित करण्यात आल्याचा अंदाज आहे. मात्र, याबाबत शिवसेना व एमआयएमच्या नेत्यांनी मौन बाळगलं आहे. कट्टर मुस्लिम एमआयएम पक्ष व हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष महापौर व उपमहापौर निवडणुकीत एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहेत.

हॉटेलमध्ये गुप्त बैठक

एमआयएमने महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली असली, तरी उपमहापौरपदासाठी आमदार पुत्र हाफिज अब्दुल्ला यांना रिंगणात उतरवलं आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांची मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या पाटणे शिवारातील एका हॉटेलवर काल गुरुवारी (दि.५) गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार लता घोडके यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर खलबते झाली. दरम्यान, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी ‘एमआयएम’चे नगरसेवक व मौलाना मुफ्ती यांच्या संपर्कात आहेत.

पाच उमेदवारांनी दिला पाठिंबा! भाजप आणि एमआयएम युतीचा पुन्हा प्रयोग, काय घडलं?

महापौर-उपमहापौर निवडणूक चुरशीची होणार असल्याचे राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. मालेगाव सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी नसरीन शेख व ताहेरा शेख, तसेच उपमहापौर पदासाठी शान -ए-हिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, एमआयएमने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत उपमहापौरपदासाठी हाफिज अब्दुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेने लता घोडके, उपमहापौरपदासाठी नीलेश काकडे व नरेंद्र सोनवणे यांना रिंगणात उतरवले आहे.

दुसरीकडे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनिमित्ताने गेल्या काही दिवसापासून प्रचारसभा, कॉर्नर बैठकामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या असून शनिवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Exit mobile version