Jayant Patil : भ्रष्टाचारात सत्ताधारी भाजपने कळस गाठलाय. सध्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे जनतेसमोर खरी परिस्थिती घेऊन जाणं विरोधी पक्षनेते म्हणून आमचं काम आहे असं म्हणत आता एक नवीन नारा आलाय. तो म्हणजे जेल’पेक्षा भाजप बरा असा हा नारा आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीका केली आहे. ते पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Sharad Pawar) यावेळी व्यासपिठावर शरद पवार, सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते.
उत्तरही दिलं जात नाही रोहित पवारांनी या तीन मतदारसंघावर ठोकला दावा, थेट शरद पवार अन् जयंत पाटलांकडं केली मागणी
यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. आज सगळ्याच क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे आम्हाला तो मांडण्याचं काम करायचं आहे. तसंच, आज कित्येक भ्रष्टाचारी नेत्यांना वाटत की आपल्याला जेलमध्ये जाण्याची वेळ येत असेल तर आपण भापमध्ये जायला हव असं जयंत पाटील म्हणाले आहेत. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या सुमारे 25 नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यापैकी 23 लोकांवरील चौकशी बंद झाली आहे असा थेट आरोप जयंत पाटलांनी केला आहे. तसंच, विधानसभेत आज विरोधी पक्ष म्हणून कोणतेही मुद्दे उपस्थित केले तर त्याचं उत्तरही आज विधानसभेत दिलं जात नाही असंही जयंत पाटील म्हणाले.
तुमच्या खिशातून पैसे जाणार राजकारणात फडतूस माणसांची नोंद घ्यायची नसते, शरद पवारांचा अतुल बेनकेंवर निशाणा
एकच बील अनेक रस्त्यांसाठी दाखवण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्यात केला आहे. तसंच, देवस्थानाच्या जमिनी लुटल्या त्याचही काही झालं नाही. सांगली जिल्ह्यात एका नेत्याने मेलेल्या माणसावर पैसे काढले असा हा भ्रष्टाचार सुरु आहे. रिंगरोड होत आहे. 136 किलो मिटर हे 16 हजार सहाशे अठरा हजार कोटी रुपयांचं हे का आहे. ते 22 हजार 799 हजार कोटी म्हणेज सहा हजार कोटी रुपयांना काम देण्यात आलं आहे. त्यामुळे आपण विचार करा. कारण आपल्या खिशातून टोल वसुली होणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार त्यांच्याकडून आणि वसुली तुमच्याकडून असं अजब काम सुरू आहे असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.