Jayant Patil : ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’, जयंत पाटलांचा महायुतीला टोला

Jayant Patil : ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’, जयंत पाटलांचा महायुतीला टोला

Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकापुर्वी होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी शेतकऱ्यांसह महिलांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहे.

तर दुसरीकडे ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ असा शब्दात राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर जयंत पाटील यांनी विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, महायुतीला लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) फटका एवढा मोठा आहे की मराठीत एक म्हण आहे ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ सध्या महायुतीची चादर फाटली असून त्यांच्याकडून खैरात वाटली जात आहे. या सरकारला खात्री झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं पराभव होणार आहे. त्यामुळे सरकारने हा शेवटचा प्रयत्न केला आहे. मात्र हा ही प्रयत्न फक्त अडीच तीन महिण्यासाठी आहे. कारण तीन महिन्यात आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे सरकार फक्त तीन महिने मोठं मोठ्या घोषणा करणार आहे. असं जयंत पाटील म्हणाले.

तर सरकारवर टीका करत त्यांनी सरकारने एक बेजबाबदारपणे बजेट मांडला आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले. सरकारने आकडेवारीची फेरफार केली आहे. सरकार निवडणुका पाहून पेट्रोल आणि गॅसचे दर कमी करत आहे. मोदी सरकारने (Modi Government) देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी घोषणा केली होती. मात्र राज्य सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहे तर तो आधार तुम्ही सक्षम पणाने दिला पाहिजे होता. सरकारने या बजेटमध्ये ठरविक लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला अशी देखील टीका जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर केली.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा मिळणार आहे.

तसेच दुधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देणार येणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करता केली.

शेतकरी, महिलांसाठी अजित पवारांकडून मोठ्या घोषणा, एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण अर्थसंकल्प

याच बरोबर नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणारअसल्याची मोठी घोषणा देखील अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज