Pune Crime News : पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. पुण्यात वारंवार गुन्हेगारीच्या घटना होताना दिसत आहेत. कालच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची ही घटना आहे. (Crime) इतकंच नाही तर मध्यरात्री दुचाकीवरुन पत्नीचा मृतदेह घेऊन शहरात फिरत असल्याचंही क्रुर क्रत्य समोर आलं आहे.
पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, जाणून घ्या सर्वकाही
बुधवारी मध्यरात्री साधारणे 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राकेश रामनायक निसार असं आरोपीचे नाव असून त्याने पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरुन तिचा मृतदेह घेऊन प्रवास करत होता. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. भूमकर पुलाकडून राकेश बायकोचा मृतदेह घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. दुचाकीवरुन मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला आडवलं. त्यानंतर त्याचं बिंग फुटलं.
आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. राकेशने पत्नीची हत्या का केली, याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून राजेशची चौकशी केली आहे. त्याचबरोबर मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि घरगुती संबंध याबाबींचाही तपास केला जात आहे. मात्र, पत्नीची हत्या करुन मृतदेह सार्वजनिक ठिकाणी नेण्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.