Beed Crime : लाथा मारून खाली पाडलं, मग दगडाने ठेचलं; माजलगावमध्ये भरदिवसा जीवघेण्या हल्ल्याचा थरार

Beed Crime : लाथा मारून खाली पाडलं, मग दगडाने ठेचलं;  माजलगावमध्ये भरदिवसा जीवघेण्या हल्ल्याचा थरार

Majalgaon Man Brutally Attacked With Stone : बीडमधील गुन्हेगारी (Beed Crime) काही थांबायचं नाव घेत नाहीये. बीडच्या माजलगावमध्ये तर 15 दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्याला संपवण्यात आलं होतं. त्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. बीडमध्ये चांगलंच दहशतीचं वातावरण आहे. असं असताना पुन्हा एक भयंकर घटना बीडमधून (crime news) समोर आलीय. एका व्यक्तीला दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न भरदिवसा (Majalgaon Man Brutally Attacked) झालाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या प्रसंगामुळे बीडच्या कायदा अन् सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

ही थरारक घटना 23 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता माजलगाव शहरातील तेलगाव रोडवर घडली. उत्तम बाबासाहेब विघ्ने, असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळतेय. संपूर्ण हल्ला महेंद्रा ट्रॅक्टर शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली (Beed News) आहेत. हल्लेखोराने पहिल्यांदा उत्तम विघ्ने यांना लाथा मारत खाली पाडलं. त्यानंतर डोक्यात दगड घालत त्यांना गंभीर जखमी केल्याचं व्हिडिओत दिसतंय. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालाय.

Video : कपाळाच्या टिकल्या काढल्या अन् ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पण..पवारांना सांगितली आपबिती…

या हल्ल्यात उत्तम बाबासाहेब विघ्ने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माजलगावमधील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मागील पाच दिवसांत माजलगावमध्ये दोन हत्येच्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत मोठं दहशतीचं वातावरण असून कायदा अन् सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित होतोय.

सध्या उत्तम विघ्ने यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सध्या उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जातोय. माजलगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेतील आरोपीचा शोध घेतला जातोय.

Video : कपाळाच्या टिकल्या काढल्या अन् ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पण..पवारांना सांगितली आपबिती…

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरदिवसा झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. उत्तम विघ्ने यांच्यावर दगडाने हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होतोय. बीड पुन्हा हादरलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube