Download App

खासदार भुमरेंच्या अडचणी वाढणार?, गिफ्ट मिळालेल्या जमीन प्रकरणात ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस

हिबानामाद्वारे छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील जमीन प्रकरण. खासदार भुमरे यांच्या ड्राव्हरला आयकर विभागाची नोटीस.

  • Written By: Last Updated:

Sandipan Bhumre Draver Land Case : छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंच्या (Bhumre) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरला हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वंशनाने दीडशे कोटीची जमीन गिफ्ट म्हणून दिल्याचं प्रकरण तापलं आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हे चांगलंच लावून धरलं आहे. दरम्यान, याप्रकरणी आता ड्रायव्हरला चौकशीसाठी आयकर विभागाची नोटीस आली आहे.

हिबानामा द्वारे संभाजीनगरमधील जालना रोडवर असलेल्या दाऊदपुरा येथील ही जमीन आहे. रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किंमतीची तीन एकर जमीन मिळाल्याबद्दल चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरन ती सुरू आहे. जावेद रसूल शेख याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. जावेद शेख याला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं.

500 कोटींचा घोटाळा, 3 एकर नाही, साडे आठ एकर जमीन ड्राव्हरच्या नावावर; जलील यांचा गौप्यस्फोट

दरम्यान, प्रकृती बरी नसल्याचं कारण देत रसूल याने चौकशीला जाणं टाळल्याचं बोललं जातय. 8 जुलै रोजी आयकर विभागाने जावेद रसूल याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तेव्हा चौकशी झाली की नाही? हे हे स्पष्ट नसलं तरी त्याला आयकर विभागाने दुसर्‍यांदा चौकशीला बोलावत नोटीस बजावल्याची माहिती आहे. मात्र, त्याने आपल्याला अजून वेळ द्यावा, अशी मागणी केल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे या पिता पुत्रांचा चालक असलेल्या जावेद रसूल याला सालारजंगच्या वंशजांनी दीडशे कोटीची संभाजीनगरमधील जमीन गिफ्ट दिल्याच्या प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला. त्यानंतर भुमरे-पिता पुत्रांनीच ही जमीन ड्रायव्हरच्या नावावर बळकावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. मात्र, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं दोघांनीही स्पष्ट केलं आहे.

follow us

संबंधित बातम्या