Download App

Solapur BJP : सोलापूर भाजपात ‘इनकमिंग’ सुरू; पण काही नाव अजूनही वेटिंगवर

  • Written By: Last Updated:

एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. पण अजूनही आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. 

अगदी दहा वर्षापर्यंत राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा आता जवळपास भाजपच्या ताब्यात गेला आहे. त्यातही उरले-सुरले काही नेतेही भाजपच्याच संपर्कात आहेत. त्यामुळे एकंदरीत अवघड परिस्थिती असलेल्या सोलापुरात राष्ट्रवादीला अजूनही काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या २१ मार्च रोजी दादाश्री प्रतिष्ठानचे उदयसिंह पाटील यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे भाजपकडून काही नेत्यांच्या प्रवेश नक्की झाला असला तरी काही नेते मात्र अजूनही वेटिंगवर असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवेशाच्या यादीसोबत वेटिंगची यादी देखील वाढत चालल्याची चर्चा आहे.

मोहोळच्या पाटलांचा प्रवेश कधी?

एकेकाळी शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मोहोळचे राजन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या पण त्यांचा प्रवेश कधी होणार, हे मात्र नक्की कोणी सांगू शकत नाही. २०१४ नंतर सगळे नेते पक्ष सोडून जात असताना राजन पाटील राष्ट्रवादीसोबत राहिले पण पक्षाकडून त्यांना नवी काही संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढच्या पिढीचा आग्रह आणि राजकीय भविष्य दोन्हीचा विचार करता त्यांच्या भाजपप्रवेश होणार असं म्हटलं जातंय. 

काही महिन्यापूर्वी दिल्ली दरबारी आणखी काही नेत्यांसोबत केलेल्या दौऱ्यावेळी त्यांचा प्रवेश नक्की झाला असं सांगितलं गेलं पण भीमा कारखान्याच्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेल्या एका वाक्यामुळे त्यांच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याच्या चर्चा आहेत. पण येत्या काही काळात राजन पाटील आपल्या दोन्ही पुत्रासह भाजपात येणार, हे नक्की.

Jayant Patil : देवस्थानच्या जमिनी लाटल्या जातात… सरकार बघ्याच्या भूमिकेत!

बागलही भाजपच्या साथीला

करमाळा मतदार संघात सध्या संजय मामा शिंदे आमदार आहेत. एकेकाळी मामांचा भाजपप्रवेश होईल, असं बोललं असताना त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं. लोकसभेचा पराभव झाला तरी विधानसभा जिंकली पण यावेळी मामाच्या विरोधात भाजपनेच कंबर कसली आहे. त्यात बागल परिवार भाजपच्या संपर्कात आहेत. त्याच कारण म्हणजे कारखाना.

आपल्या राज्यात कारखाने टिकवायला आणि कारखान्यातील प्रकरण मिटवायला सत्ताधारी पक्षाची साथ लागतेच परिणामी मकाई आणि आदिनाथच्या भविष्यसाठी तरी बागल देखील भाजपच्या  साथीला जातील, असं समीकरण नक्की मानलं जात आहे. 

संजय मामाच्या विरोधातले बागल भाजपात प्रवेश करत असले तरी मामाच्या घरातलेच भाजप प्रवेश कधी होणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. माढ्याचे आमदार बबनदादाचा प्रवेश होणार की सध्या फक्त त्यांच्या पुढच्या पिढीचा प्रवेश होणार, याच उत्तर प्रवेश झाल्यावरच मिळेल.

देशमुखांच्या ‘साथी’लाही पाटील

बराच काळापासून लांबलेल्या महापालिका निवडणूका येत्या काही काळात होतील, त्यामुळे महापालिकेतील सत्ता टिकवायला भाजपाला जुन्या सोबत काही नवीन चेहऱ्यांची गरज आहे. म्हणून उदयशंकर पाटील उद्या भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे सोलापूरचे भाजपचे कारभारी असलेल्या विजयकुमार देशमुख यांच्या साथीला लवकरच पाटीलही येणार आहेत. 

Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…

सध्या भाजपचे आक्रमक नेते असलेल्या गोपीचंद पडळकर यांचे मित्र असलेले उत्तमराव जानकर देखील भाजपच्या प्रवेशासाठी तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पण मोहित पाटील यांचे विरोधक असलेल्या जानकर यांचा प्रवेश मोहिते पाटील होऊ देणार का, असा प्रश्न असणारच आहे. सांगोल्याचे दिपक आबाही याच यादीत असल्याचा चर्चा आहेत. पण त्यांच्या प्रवेशाचा शहाजीबापूंचा ग्रीन सिग्नल असणार का ? असा प्रश्न आहेच.

दरम्यान सोलापुरात कारखान्याचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटीलही अधून मधून भाजपात प्रवेश करणार असल्याचा चर्चा आहेत. मधल्या काळात ईडीच्या धाडी पडल्यानंतर अभिजित पाटील यांचा प्रवेश नक्की मानला गेला पण प्रवेश झाला नाही. तर पाहिलं तर सोलापूर हा साखर कारखान्याचा जिल्हा मानला जातो आणि  कारखाने टिकवायला सरकार सोबत लागत, त्यामुळे कारखाना वाचवायला, त्याचे हप्ते, कर्ज चुकवायला सरकारी पातळ्यांवरून मदत लागतेच. त्यातच सोलापूर जिल्हावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करतच आहे. तर येत्या काळात कोणाकोणाचे प्रवेश होणार आणि कोण कोण वेटिंगवर राहणार? हेही लवकरच दिसेल.

Tags

follow us