Download App

Heatwave : राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त, वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ

Increase Demand of Electricity Due to Heatwave : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल आहे. मात्र या दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. या उष्णतेच्या लाटेने उष्माघाताचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर वडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र यामुळे आता राज्यातील विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे.

उकाडा वाढल्याने फॅन, कुलर, एसी यांच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली. एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार 678 मेगावॅटवर पोहचली आहे. महावितरणच्या ग्राहकांची आजवरची ही सर्वात जास्त वीज मागणी आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ही मागणी 24 हजार 996 मेगावॅट नोंदवण्यात आली होती.

दरम्यान देश आणि राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी उन्हाचा तडाखा वाढत आहे. तर कधी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शातकरी संकटात सापडले आहेत. तर एप्रिल महिन्यातच बहुतांश शहरात तापमानाचाा पारा 40 ते 44 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Thane Fire : ठाण्यात दोन इमारतींना भीषण आग, 10 तासांनंतर आग आटोक्यात

यातच तीव्र उन्हामुळे उष्मघाताचा (Heat stroke) देखील धोका हा निर्माण होत असतो. उष्मघात हा जीवघेणा देखील ठरू शकतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही बचावात्मक उपाय सांगणार आहोत. हिट स्ट्रोक टाळण्यासाठी उपाय करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात अंगातील पाणी कमी होऊन तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्याला बळी पडू शकतात . यासाठी या काळात अशा पदार्थांचे सेवन करणे चांगले मानले जाते, ज्याचा थंड प्रभाव पडतो. काकडी, कलिंगडयांसह अश्या अनेक थंड पदार्थांचे सेवन करून तुम्ही स्वतःला थंड ठेवू शकता.

Tags

follow us

वेब स्टोरीज