राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Inflation allowance) वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात बंपर वाढ; केंद्रानंतर राज्य सरकारने घेतला निर्णय (Increase in dearness allowance of state government employees)
काही महिन्यांत विविध राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ झाली. आता महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा भत्ता वाढविण्याची मागणी होत होती. महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. आज वित्त विभागाने शासन निर्णय घेऊन महागाई भत्त्यात वाढ करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे.
Vikhe Vs Pawar : राष्ट्रवादी हा तळ्यात-मळ्यातील पक्ष; राधाकृष्ण विखेंनी पवारांना डिवचले !
राज्य सरकारने काढलेल्या पत्रकात सांगितलं की, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरुन ४२% करण्यात आला. हा महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
यापूर्वी कर्नाटक सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली होती. तामिळनाडूनेही महागाई भत्यात चार टक्यांनी वाढ केली असून आता महागाई भत्ता हा ४२ टक्क्यांवर पोहोचला. २५ मार्च रोजी राजस्थानच्या गेहलोत सरकारने राज्य सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट दिलं होतं. त्यानंतर केंद्राने ३ एप्रिल २०२३ रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे. दरम्यान, आता राज्य सरकारनेही महागाई भत्त्यात वाढ केल्यानं राज्य सरकारी कर्मचारी आनंदात आहेत.