Download App

साईबाबा मंदिरात हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी; मंदिर प्रशासनाचा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.

Saibaba Mandir : काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध (India-Pakistan War) सुरु असल्याची परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करीत दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यानंतर पाकिस्ताननेही कुरापती करीत भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारताने सडेतोड उत्तर देत हे हल्ले परतवून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या शिर्डीमधील साईबाबा (Saibaba Mandir) मंदिरात हार, फुले, प्रसाद नेण्यावर भाविकांना बंदी घालण्यात आलीयं. मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलायं.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर 15 व्या दिवशी म्हणजेच ७ मे रोजी पहाटे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली. भारतीय सैन्याने 7 मे रोजी पहाटे 1:05 ते 1:30 दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या काळात भारतीय सैन्य आणि नौदलाने संयुक्त कारवाई करून पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले एकूण 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

पाकिस्तान सुधारणार नाहीच! युद्धबंदीनंतर तीन तासांतच ड्रोन हल्ले; श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट

भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान पूर्णपणे गोंधळून गेला होता. यानंतर 8 मे रोजी पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्या रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतीय सैन्याने हा हल्ला हाणून पाडला.

Video : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले पाकिस्तानी चौक्या अन् दहशतवादी लाँचपॅड

सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 मे रोजी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. या रात्री पाकिस्तानने सीमेपलीकडून गुजरातपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत भारतातील एकूण 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो भारतीय सैन्याने हाणून पाडला. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील भारताच्या 36 भागांवर 300 ते 400 ड्रोनने हल्ला केला. पण यावेळीही त्याची निराशा झाली.

दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी दुपारी 3:35 वाजता भारतीय DGMO ला फोन केला. यावेळी पाकिस्तानने युद्धबंदीचा मुद्दा उपस्थित केला, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची पुष्टी केली आणि सांगितले की, दोन्ही बाजूंनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमिनीवर, समुद्रात आणि हवेत सर्व लष्करी कारवाया प्रभावीपणे थांबवण्यास सहमती दर्शविली. युद्धबंदी लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

follow us