विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुचनेनंतर इंडिगोकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु, 600 अधिक झाली उड्डाणं

विमान वाहतूक मंत्रालयाने जलद नेटवर्क स्थिरीकरणाबाबत निवेदन तयार केल्याने प्रमुख शहरांमध्ये ६००+ उड्डाणे झाली.

News Photo   2025 12 07T180053.189

News Photo 2025 12 07T180053.189

मागील दोनचार दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. (Indigo)  याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. त्यानंतर कालपासून हळूहळू इंडिगो एअरलाइन्सची सेवा पुर्वपदावर येत आहे. काल 1500 पेक्षा अधिक उड्डाणे सुरु झाली आहेत. तसंच, आज देखील इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं नियोजन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं नियोजन करण्यात आलं आहे. पण दुसरीकडे इंडिगोच्या जवळपास 650 फ्लाईट्स आणखी देखील रद्दच आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. काल इंडिगोच्या 1500 फ्लाईट्सनं उड्डाण केलं होतं. दररोज इंडिगोच्या जवळपास 2300 फ्लाईट्स उड्डाण घेतात. आज वेळेवर उड्डाणांची कामगिरी 75 टक्के, काल फक्त 30 टक्के विमानं इंडिगोची वेळेनुसार उड्डाणं केली होती. 138 पैकी 137 ठिकाणी फ्लाईट्स ऑपरेशन्स कार्यरत आहेत. 15 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी रद्दीकरण/पुनर्नियोजनावर पूर्ण शुल्क माफी करण्यात आली आहे.

इंडिगो विमानसेवा खंडीत; मध्य रेल्वे धावली मदतीला, 14 विशेष गाड्या जाहीर

इंडिगो एअरलाईन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात (Ticket Price) मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे.

काल शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ‘एक्स’वर जाहीर केले.

इंडिगो फ्लाइट स्टेटस कसे तपासायचे

फ्लाइट स्टेटस तपासा – तुमची फ्लाइट रद्द झाली आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी तुमच्या पीएनआरसह इंडिगोची वेबसाइट किंवा अॅप ‘बुकिंग व्यवस्थापित करा’

पर्याय निवडा – कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुढील उपलब्ध फ्लाइटवर पूर्ण परतावा दावा करायचा की पुन्हा बुक करायचा ते ठरवा.

परतफेड विनंती सबमिट करा – इंडिगोच्या परतफेड पृष्ठावर तपशील भरा (पीएनआर, ईमेल, प्रवासी माहिती) आणि सबमिट करा.

इंडिगो फ्लाइट का रद्द केल्या जातात?

या आठवड्याच्या सुरुवातीला, इंडिगोला फ्लाइट वेळापत्रक व्यवस्थापित करण्यात अडचणी येऊ लागल्या. तांत्रिक आणि इतर समस्यांमुळे, इंडिगोसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे वैमानिकांची संख्या हे ठरलं.

फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) नावाचे नवीन नियम वैमानिक आणि क्रू किती तास काम करू शकतात यावर मर्यादा घालतात. यामुळे, विमान कंपन्यांना आता अधिक वैमानिक आणि क्रूची आवश्यकता आहे, ज्यामुळे त्यांच्या नेटवर्कवरील उड्डाण वेळापत्रकात बदल झाले आहेत आणि उड्डाण रद्द झाले आहेत.

परतफेड प्रक्रिया

ऑनलाइन पेमेंट: ५-७ व्यावसायिक दिवसांत त्याच कार्डवर परतफेड जमा होते.
रोख बुकिंग: तिकीट आणि आयडीसह विमानतळ तिकीट काउंटरला भेट द्या.
मागोवा घ्या आणि संपर्क साधा – पुष्टीकरणासाठी ईमेलचे निरीक्षण करा. ७-१० दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, मदतीसाठी इंडिगो सपोर्ट किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधा.

डीजीसीएने इंडिगोला तात्पुरती सूट दिली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने उड्डाण ऑपरेशन्स स्थिर करण्यास आणि प्रवाशांचे व्यत्यय कमी करण्यास मदत करण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सला विशिष्ट क्रू ड्यूटी नियमांमधून एक वेळची तात्पुरती सूट दिली. नियामकाने म्हटलं आहे की या सूटमध्ये 0000-0650 तासांपर्यंत रात्रीच्या ड्युटी अंतर्गत तरतुदी आणि सुधारित फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स (FDTL) नागरी विमान वाहतूक आवश्यकता कलम 7 मालिका J भाग III रेव्ह 2, फेज-II च्या रात्रीच्या ऑपरेशन्सवरील निर्बंध समाविष्ट आहेत, जे एअरलाइनच्या A320 फ्लीटला लागू आहे आणि 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे.

Exit mobile version