दोन ते तीन दिवसात क्लिप टाकणार अन्…, साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराज घेणार मोठा निर्णय

Indurikar Maharaj : मुलीच्या साखरपुड्यावरुन प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj : मुलीच्या साखरपुड्यावरुन प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर प्रचंड खर्च केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. आपल्या किर्तनात लग्न कमी खर्च्यात आणि साध्या पद्धतीने करा असं सांगणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यावर प्रचंड खर्च करत आहे अशी टीका सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांवर होत आहे. तर आता या प्रकरणात इंदुरीकर महाराज यांनी प्रतिक्रिया देत आपण किर्तन सेवा थांबवण्याचा विचार करत असल्याचे बोलून दाखवले.

नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज ?

आम्ही किती कष्ट केले याचा लोकं कधीही विचार करत नाही. आम्ही संसार कसा केला हे पण लोकांना माहिती नाही. मी आठ आठ दिवस लेकरांना भेटत नव्हतो मात्र आता लोकं इतके खाली गेले की माझ्या मुलीच्या कपड्यावर बोलत आहे. मला लावा ओ घोडे पण माझ्या मुलीचा आणि कुटुंबीयांचा काय दोष? या कॅमेऱ्यावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्कील केला. साखरपुड्यासाठी नवरीसाठी कपडे नवऱ्याकडचे आणतात एवढी तर अक्कल किल्प टाकणाऱ्याला पाहिजे. लोकं किती नालायक असावा पण किती याला मर्यादा आहे. आता मी कंटाळलो आहे. दोन- तीन दिवसात मी क्लिप टाकणार आहे. आता बस गेल्या तीस वर्षात मी सगळ्या टीका सहन केल्या पण आता माझ्या घरावर टीका होत आहे. माझ्यापर्यंत टीका ठीक होत्या पण आता माझ्या कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे, म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे असं इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणाले.

मोठी बातमी! दिल्लीत आणखी एक स्फोट; महिपालपूरमधील रेडिसन हॉटेलजवळ स्फोटसदृश घटना

नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला 2000 पेक्षा जास्त लोक उपस्थितीत होते असं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर लोकांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर आता इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा विचार करत असल्याचे बोलून दाखवले आहे.

Exit mobile version