इंदुरीकर महाराजांच्या हास्य-विचारांची वारीला तरुणांची गर्दी; प्रोमोने पार केलं 1M+ व्ह्यूज!

Ashadhi Ekadashi Special : कीर्तन म्हटलं की डोळ्यांसमोर वारकरी, अभंग आणि पारंपरिक भक्तिरस उभा राहतो. पण या वर्षीच्या आषाढी एकादशीला एका वेगळ्या दृश्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे , इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) कीर्तनाला झालेली तरुण मंडळींची प्रचंड गर्दी. हास्य आणि विचारांचं हे अनोखं मिश्रण इतकं प्रभावी ठरतंय की झी टॉकीजने (Ashadhi Ekadashi Special) प्रसिद्ध केलेल्या प्रोमोला अवघ्या काही तासांतच 1 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ते वाढतचं आहेत.
ही केवळ विठ्ठलभक्ती नव्हे, ही एका नव्या पिढीची विचारशील भक्ती आहे. जिथे हसणं हे आध्यात्माचं साधन बनतं आणि समाजप्रबोधन हे भक्तीचं स्वरूप आहे. या झी टॉकीजवर होणाऱ्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी नेहमीच्या शैलीत विनोदाची पेरणी करत, शिक्षण, विवाह, धर्म आणि डिजिटल युगातली मूल्यं यावर अफलातून भाष्य केलं आहे.
सगळ्यात विशेष बाब म्हणजे ही सभा केवळ वयोवृद्ध भक्तांनी नव्हे, तर कॉलेज तरुणाईने डोक्यावर फेटा बांधून, डोळ्यात चमक घेऊन अनुभवलेली होती. 6 जुलै, रविवार रोजी सकाळी 9 आणि संध्याकाळी 6 वा., इंदुरीकर महाराजांचं हे विशेष कीर्तन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
आमिर खानला ‘सितारे ज़मीन पर’ च्या यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान
#AashadhiSohala2025 अंतर्गत आयोजित या विशेष मालिकेच्या माध्यमातून झी टॉकीजने वारकरी परंपरेला डिजिटल युगाशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. विठ्ठलनामाच्या गजरात हास्य आणि विचारांची अशी ‘वारी’ पुन्हा कधी दिसणार? रविवार 6 जुलैची तारीख लक्षात ठेवा.