आमिर खानला ‘सितारे ज़मीन पर’ च्या यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान

Aamir Khan : आमिर खान (Aamir Khan) यांचा नवा चित्रपट ‘सितारे ज़मीन पर’ (Sitare Zameen Par) , ज्याला ‘तारे ज़मीन पर’ या त्यांच्या आयकॉनिक चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल मानले जाते, हा 2025 मधील सर्वाधिक आवडता थिएटर रिलीज ठरला आहे. हास्य, भावना आणि आशेने भरलेल्या या हृदयस्पर्शी कथानकाने प्रेक्षक आणि समीक्षकांचे मन जिंकले आहे.
आजच्या ओटीटी युगात जिथे अनेक निर्माते थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाण्याचा पर्याय निवडतात, तिथे आमिर खान यांनी थिएटर रिलीजची निवड केली आणि देशभरातील थिएटर मालक व वितरकांनी त्यांच्या या निर्णयाचं मनापासून कौतुक केलं. चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील मल्टिप्लेक्स एग्झिबिटर्सनी एक विशेष सन्मान सोहळा आयोजित केला, ज्याला आमिर खान स्वतः उपस्थित होते.
या कार्यक्रमात आमिर यांना एग्झिबिटर्सकडून दिलेले गौरवचिन्ह आणि आभारांचे क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले, ज्यातून या सिनेमॅटिक यशाचं खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन दिसून आलं. PVR सिनेमाज ने फोटो शेअर करत लिहिलं की, “When the Sitaare align, magic happens! PVR INOX Pictures आणि Cinepolis यांनी मिळून एक खास सायंकाळ आयोजित केली होती, जिथे देशभरातील एग्झिबिटर्सनी आमिर खान यांना ‘सितारे ज़मीन पर’ च्या यशाबद्दल सन्मानित केलं. हा चित्रपट आणि त्यामागचं सिनेमा प्रेमाचा खरा उत्सव! ”
नाटके केली तर कानाखाली आवाज…, उद्योजक केडिया प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
‘सितारे ज़मीन पर’ या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबत अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर 10 नवोदित कलाकारांची चमकदार टीम झळकते आहे.