नाटके केली तर कानाखाली आवाज…, उद्योजक केडिया प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Marathi Vijayi Melava : राज्यात सुरु असणाऱ्या भाषावादा दरम्यान उद्योजक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी उडी घेत मी मराठी भाषा शिकणार नाही, राज ठाकरे काय करणार? असं पोस्ट करत मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. तर आता या प्रकरणात मराठी भाषा विजयी मेळाव्यात (Marathi Vijayi Melava) बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वरळी डोम येथे आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, व्यापारी केडियाच्या कपाळावर लिहिलं होतं का? तो गुजराती आहे म्हणून. हिंदी चॅनेलवाले सुरु झाले गुजराती माणसाला मारलं. दोघात बाचाबाची झाली तेव्हा एक मराठी निघाला आणि दुसरा गुजराती त्यात एवढं काय? असं राज ठाकरे म्हणाले. अजून तर आम्ही काहीच केलेलं नाही. मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना मराठी आली पाहिजे यात वाद नाही. परंतु विनाकारण मारहाण करायची नाही पण जास्त नाटक केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे पण चूक त्यांची पाहिजे असं या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुणी जास्ती नाटके केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे पण अशी गोष्ट कराय तेव्हा त्याचे व्हिडिओ काढू नका हे आपल्यातले आपल्यात कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नसतो आणि मार खाणारा सांगत सुटतो. त्यांना सांगू देत पण उठसूट कुणालाही मारायचं नाही असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्राकडे आणि मराठीकडे वाकड्या नजरेने पाहू नका. आम्ही शांत आहोत, म्हणजे गांडू नाही. असा इशारा देखील राज ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना दिला.
जे बाळासाहेब यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
नेमकं काय म्हणाले होते उद्योजक सुशील केडिया?
सुशील केडिया यांनी मराठी भाषा वादावरुवन सोशल मीडियावर पोस्ट करत आपण मराठी भाषा शिकणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, राज ठाकरे याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो पण मला व्यवस्थित मराठी येत नाही. आता तुमचं यासंदर्भातलं बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पण केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मरठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला असं उद्योजक सुशील केडियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.