Inefficient woman president of Commission for Women Sushma Andhare criticizes Rupali Chakankar and praises Rupali Thombre : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. यावरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर आणि ठोंबरे या दोघींवर कौतुकाचा वर्षाव आणि टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
महिला आयोग हा महिलांच्या तक्रारी ऐकण्यासाठी 24 तास उपलब्ध असला पाहिजे. अनेकदा तर महिला आयोगापर्यंत अनेक महिलांना पोहचणं शक्य होत नाही. अशा वेळी महिला आयोग तत्पर असला पाहिजे. त्यांनी स्वत: पिडीतेपर्यंत पोहचावे आणि पिडीतेला न्याय द्यावा. पण एवढी तत्परता सध्या महिला आयोगाकडे नाही. सत्ताधाऱ्यांपैकी ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्षपद आलेले आहे. या महिला आयोगाकडे आलेल्या 100 पैकी 90 केसेस फेल आहेत. ज्या 5-10 टक्क्यांचे निकाल ते सांगतात. ते सुद्धा सत्ताधारी लोकांना न्याय द्यायचा म्हणून केलेले आहे.
अजित पवार हे गुंडांच्या टोळीचे आका आहेत का? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली असली तरी देखील आशादायक बाब ही आहे की, याच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चाकणकरांची रूपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रूपालीने दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. दादा, 100 पैकीं 90 प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे?
…अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे, नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तटकरे स्पष्टच बोलले
वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झालंय. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे गायब केल्याचा दावा केला जात होता. याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक माहिती दिली होती. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा (Ajit Pawar ) दावा त्यांनी केला होता. अखेर पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतलंय.
महिन्याभरात पवार दुसऱ्या पक्षात जातील अन् सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…; शिरसाटांचे मोठे विधान
बाळ कस्पटेंकडे सोपवा, अशा स्पष्ट सूचना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) दोन महिला नेत्यांना केल्या होत्या. त्यानंतर बाळ ताब्यात घेऊन कस्पटे कुटुंबाकडे सोपविण्यात आलंय. वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना कस्पटेंच्या घरी जाऊन बाळ सोडवायला अजित पवारांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे बाळ कस्पटेंच्या घरी पोहोचविण्यात आले. बाळाला पाहून मात्र आजी-आजोबांना अश्रू अनावर झाले होते.