महिन्याभरात पवार दुसऱ्या पक्षात जातील अन् सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…; शिरसाटांचे मोठे विधान

महिन्याभरात पवार दुसऱ्या पक्षात जातील अन् सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…; शिरसाटांचे मोठे विधान

Sanjay Shirsat : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) दिले होते. आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जावं वाटतं, असं विधान पवारांनी केलं होतं. पवारांच्या वक्तव्याची री ओढत आता मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं. राजकारणात काहीही अशक्य नाही. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील, असं विधान शिरसाट यांनी केले.

किश्तवाडमध्ये चकमक! दोन अतिरेक्यांना कंठस्नान; एक जवान शहीद, ऑपरेशन त्राशी सुरुच.. 

तसंच सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची आधीपासून इच्छा आहे. त्या मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, असंही शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडी म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू, या आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याविषयी शिरसाट यांना विचारलं असता ते म्हणाले, मानसन्मानाचा प्रश्न आता येतो कुठं? रोहित पवार यांना माहित आहे की आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचं नाही. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्कराताहेत. काका आधीच दुसरीकडे गेले आहेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीबरोबर राहणं, हे त्यांना पचनी पडणार नाहीये आणि ते राहणार पण नाहीत, असं शिरसाट म्हणाले.

धुळे रोकड प्रकरणी जालन्याचे आमदार अर्जून खोतकर अन् कमिटीचे चेअरमन…अनिल गोटेंनी थेट नावचं घेतलं 

येणारे राजकारण तुम्हाला वेगळ्या धाटणीचे पाहायला मिळेल. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील, असंही शिरसाट म्हणाले.

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री दिसतील का? असा प्रश्न विचारला असता शिरसाट म्हणाले की, हे नाकारता येत नाही. राजकारणात काहीही अशक्य नाही. सुप्रिया सुळे यांची सुरुवातीपासूनच तशी तीव्र इच्छा होती. जर ती पूर्ण होत असेल तर मला वाटतं तडजोड करायला काही हरकत नाही, असं शिरसाट म्हणाले.

शिरसाट पुढे म्हणाले की, शरद पवार या महिन्याच्या अखेरीपर्यंत महायुतीत सामील होणार नाहीत. पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत उलाढाल होती, असं राजकीय वर्तुळातून कळतंय. ती माहिती खरी की खोटी माहिती नाही. पण, आता लवकरच एकत्र येतील, असं सांगत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याचे संकेत शिरसाट यांनी दिलेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube