धुळे रोकड प्रकरणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर अन् कमिटीचे चेअरमन…अनिल गोटेंनी थेट नावचं घेतलं

धुळे रोकड प्रकरणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर अन् कमिटीचे चेअरमन…अनिल गोटेंनी थेट नावचं घेतलं

Anil Gote On Dhule Government Rest House crores of rupees found : धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Dhule) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी (Anil Gote) केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडलं होतं. खोलीत घेतलेल्या झडतीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळली होती. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने अनिल गोटे यांच्यासोबत विशेष संवाद साधला.

यावेळी बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय की, काल धुळ्यात रेस्ट हाऊसमध्ये जो प्रकार घडला, तो पैसा अधिकाऱ्यांचा होता. महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समिती आली होती. दरवेळेला अधिकाऱ्यांना असे पैसे दिले जातात. अधिकाऱ्यांकडून असे पैसे घेतले (Maharashtra Politics) जातात. मी आमदार असताना मी कमिटीमध्ये होतो. ही रक्कम थोडी थोडकी नसते, प्रचंड मोठी असते. त्यावेळचे कलेक्टर, एसपी, जिल्हा परिषद सीईओ या सगळ्यांशी माझं भांडणं झालं होतं. तुम्ही पैसे का गोळा करत आहात?

“हगवणे कुटुंबाकडून मलाही आमंत्रण मिळालं होतं पण मी..”, सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं?

ते म्हणाले आम्ही पैसे गोळा करत नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी पाच लाख रूपये देताना पकडलं. ती भानगड सरकारने मिटवून टाकली. जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या सगळ्यांच समितीच्या अध्यक्षांना, त्यामध्ये सदस्य असतील, आमदार असतील त्यांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. तिथे पाच दिवसापासून एका आमदाराचा पीए राहात होता. त्याचेच हे पैसे होते. किशोर पाटील, असं नाव देखील अनिल गोटे यांनी लेट्सअप मराठीसोबत बोलताना घेतलं आहे.

अर्जून खोतकरांनी आरोप फेटाळले आहेत, यावर अनिल गोटे म्हटले की, आरोप कोणी कबूल करत नाही. पैसे पाच कोटी होते. मी जायच्या आधी त्यांनी काही पैसे एका अनोळखी गाडीमध्ये परस्पर रवाना केले होते. मी पोहोचण्यापू्र्वीच हे केलं होतं, परंतु मी पोहोचल्यानंतर त्यांना एक रूपयाही काढता आला नाही. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेथे आले होते, त्यांचं काहीही म्हणणं होतं. जप्त झालेले पैसे सरकारी तिजोरीत जमा केले जातील, यथावकाश हडप करतील असं गोटे यांनी म्हटलंय.

विजेचा खेळखंडोबा! बत्ती गुल झाल्याने नगरकर संतापले, थेट अधिकाऱ्यांना….

संबंधित अधिकार केसेस दाखल करायला तयार नाही, असं गोटे यांनी म्हटलंय. अधिकाऱ्यांवर सरकार अन् मुख्यमंत्री यांचा दबाव आहे. वाट पाहायची सरकार करतं, मी तलवार घेवून बाहेर निघू शकत नाही. जालन्याचे आमदार अर्जून खोतकर, कमिटीचे चेअरमन यात आहेत. मी स्वत: आमदार असताना असे पैसे पकडून दिले होते. त्यांनी मला कमिटीतून काढलं होतं. मी पंचायत राज कमिटीत होतं. पुढे काहीही झालं नाही, असं देखील अनिल गोटे यांनी म्हटलंय. तपास करणारे लोक सरकारचे आहेत. काहीही होत नाही, अशी देखील खंत अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे.

अंदाज समितीचं काम काय?

शासकीय कामांमधील भ्रष्टाचार आणि अनियमितता तपासण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती असते. समिती राज्यभर दौरे करून विकास कामांची पाहणी करते. या प्रक्रियेत गेली अनेक वर्ष अशाच प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जाते.

अंदाज समितीत कोण आहेत?
समिती प्रमुख हे आमदार अर्जुन खोतकर असून समिती सदस्य आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित असल्याल्या बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात अली आहे

धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा अंदाज समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube