विजेचा खेळखंडोबा! बत्ती गुल झाल्याने नगरकर संतापले, थेट अधिकाऱ्यांना….

विजेचा खेळखंडोबा! बत्ती गुल झाल्याने नगरकर संतापले, थेट अधिकाऱ्यांना….

अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. त्यानंतर जिल्ह्यात रोज महावितरणकडू (Mahavitaran) विजेचा लपंडाव सुरु झालाय. यामुळे नगरकर चांगलेच हैराण झाले आहे. नगर शहराबरोबरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या समस्येमुळे नागरिकांचे मोठे हाल होऊ लागले आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने महावितरण विभागाबाबत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सोने तस्करी प्रकरण, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारकडून गृहमंत्र्यांची पाठराखण  

मागील काही दिवसांपासून नगर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या याच समस्या घेऊन आता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याकडून महावितरणच्या या कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी याबाबत आंदोलन देखील करण्यात येत आहे. अहिल्यानगर कार्यालयात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या अधीक्षक कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर मेणबत्या लावून जाब विचारण्यात आला.

नुसती भूरभूर तरी बत्ती गुल…
पावसाळा असो किंवा कोणताही ऋतू महावितरणच्या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने ग्राहकांमध्ये महावितरण बाबत नाराजी आहे. वीजपुरवठा खंडित झाला की अनेकांकडून महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, पण महावितरण अधिकारी किंवा कर्मचारी कोणीच फोन उचलत नाही हे नेहमीच कारण आहे. पावसाळ्यात तर हे रोजचेच आहे. थोडा पाऊस पडला, की वीज जाते.

कधी खबरदारी म्हणून कार्यालयाकडूनच बंद केली जाते, तर कधी यंत्रणेतच बिघाड झाला असे सांगत अनेकद वीज गायब असते. गेल्या काही वर्षांत यात काहीच सुधारणा झालेली नाही. आम्ही बिल वेळेवर भरतो, पण तरीही अंधारात राहावं लागतं. यावर कायमस्वरूपी उपाय का होत नाही? असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जातो आहे.

अवकाळीचा फटका! अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी 

पावसाळ्यापूर्वी यंत्रणा दुरूस्ती करावी
सध्या मे महिन्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. मात्र जून पासून खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात होत असते. वीजपुरवठा सुरळीत राहावं यासाठी महावितरणने यंत्रणा दुरुस्त करावी, वीजखांब, तारा आणि रोहित्रांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पावसाळ्यात वीज गेली, की तासनतास वाट पाहावी लागते. यंदा तरी ठोस उपाय करा, जेणेकरून अखंडित वीज मिळेल, अशी अपेक्षा नागरिक करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube