अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार?

  • Written By: Published:
अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार?

धुळेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. तर काही माजी आमदार, पदाधिकारी ही अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. त्यामुळे गोटेही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील मोठे नेते गोटे यांनी साथ सोडल्यास शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.(anil gote resign regional vice president of ncp sharad pawar group)

आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अनिल गोटे यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी ते कोणत्या पक्षात जातील, याबाबत अद्याप त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाही. ते अजित पवार गटात किंवा शिवसेनेत (उद्धव ठाकरे) जाऊ शकतात, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

मोठी बातमी ! सात पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; पुणे अन् चंद्रपूरसाठी ‘वेट अँड वॉच’

धुळ्यातील स्ट्राँग नेते असलेल्या अनिल गोटे हे अनेकदा चर्चेत असतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले झाले होते. त्यानंतर भाजपमध्ये अनेकांशी त्यांचे खटके उडाले होते. गोटे व देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वादही समोर आला होता.

त्यानंतर गोटे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अनिल गोटे यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादीमध्येही दोन गट असल्याने तेथेही गोटे यांचा वाद होत होता. त्यामुळे गोटे यांनी पक्षाचा पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. हा राजीनामा चार दिवसांपूर्वीच दिल्याचे बोलले जात आहे. गोटे हे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे ते कोणती भूमिका जाहीर करतात, या कडे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube