Dhule News : संजय राऊतांची पोस्ट अन् पोलिसांची धाड, शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचं घबाड

Dhule News : संजय राऊतांची पोस्ट अन् पोलिसांची धाड, शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचं घबाड

Sanjay Raut : विधिमंडळ आमदारांची समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना या समितीसाठी कोट्यावधी रुपयांचा मलिदा देण्यासाठी धुळ्यातील शासकीय विश्रामगृहावर कोट्यावधी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. त्यानंतर पोलिसांनी धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलायं.

यासंदर्भात संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. राऊत पोस्टमध्ये म्हणाले, “विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता , या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेला नाही, प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही आहे विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत!” असं संजय राऊत म्हणाले होते.

मराठवाड्यात अवकाळीचा धुमाकूळ; वीज कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, तर…

संजय राऊत यांच्या या पोस्टनंतर अनेक तास उलटुनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची टीकाही राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये केली होती. त्यानंतर पोलिसांना शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या खोलीत मोठ्या प्रमाणावर रोकड रक्कम असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली होती. रक्कम असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस अधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पंचनामा करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात ११ आमदार आले आहे. या समितीत आलेल्या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या दोन नंबरच्या खोलीत ठेवण्यात आले आहेत, असा आरोप शिवसेने ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube