Download App

“गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत जे झालं तेच…” एकनाथ खडसेंचा भाजपवर आरोप

  • Written By: Last Updated:

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या बाबतीत जे झालं तेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बाबतीत भाजप करते आहे. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.  मलकापूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना किती त्रास दिला, हे मला माहिती आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट बघायला लावली होती, त्यावेळी मी त्यांच्यासोबत हजर होतो.” यावेळी त्यांनी पकंजा मुंडे यांच्यावर देखील अन्याय केला जात आहे, असा आरोप केला. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्या यांचीही पक्षात उपेक्षा केली जात आहे.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

ओबीसी समाजावर अन्याय

दरम्यान त्यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही केला. यावर बोलताना ते  म्हणाले की भाजपने नेहमीच ओबीसी समाजाची  हेळसांड केली आहे. अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये अपमान सहन करावा लागला त्यांना त्रास देण्यात आला. असा आरोप त्यांनी केला.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

आता या सगळ्यावर पंकजा मुंडे काय उत्तर देणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडे (Pankaja Munde ) नाराज असल्याच्या चर्चांनी उत आणला होता. पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार अशादेखील चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगल्या होत्या. मात्र, आपण पक्षात किंवा पक्षातील नेत्यांवर नाराज नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते.

Tags

follow us