Download App

Gunaratna Sadavarte : ‘बागेश्वर बाबांचा अपमान सहन केला जाणार नाही’

  • Written By: Last Updated:

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाला कोर्टात केलेले विरोध असोक, एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन असो वकील गुणरत्न सदावर्तेंची (Gunaratna Sadavarte) चर्चा कायम माध्यमात नसते. आताही गुणरत्न सदावर्तेंनी पंडीत धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांची बाजू घेत मोठं वक्तव्य केलं. बागेश्वर बाबांचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असं सदावर्ते म्हणाले.

धीरेंद्र शास्त्री हे सामान्य लोकांना चमत्कार दाखवून त्यांना भुरळ घालतात, असा आरोप त्यांच्यावर होता. शिवाय धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याविषयी काही वादग्रस्त विधान केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात संतापाची लाट होती. तरीही त्यांचा कार्यक्रम काल मुंबईत घेण्यात आला. मात्र, हा कार्यक्रम होऊ नये म्हणून अंधश्रद्धा निमूर्लन समितीसह अनेक राजकीय नेत्यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ नये, असं म्हटलं होतं. धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार असून जे लोक हा कार्यक्रम आयोजित करता आहेत, ते देशद्रोही असल्याची टीका काही नेत्यांनी केली होती.

बागेश्वर महाजारांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असं पत्र कॉंग्रेसेच नाना पटोल यांनी लिहिलं. बागेश्वर महाराजांचा कार्यक्रमाला समंती देणं म्हणजे अधश्रध्देला खतपाणी घालणं आहे. कारण, महाराष्ट्र हे प्रगतीशील विचारांचं राज्य असून अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या लोकांना इथं जागा नाही. बागेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून वारकरी लोकांच्या भावना दुखावल्या, असं पटोले म्हणाले होते. दरम्यान, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला.

Bageshwar Dham Sarkar: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांनी साधला डाव !

गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं की, बागेश्वर बाबांचा अपमान कदापी सहन करणार नाही. बागेश्वर बाबा हे कायम संविधानाची आणि हिंदूराष्ट्राची भाषा करणारे संत आहेत. आणि अशा संतांचा अपमान होत असेल तर मी गप्प बसणार नाही. भारतात लोकशाही आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणी काय बोलायचं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. बागेश्वर बाबांना विनाकारण होत असलेला विरोध आम्ही मोडून काढू. कारण, बांगेश्वर बाबाचा अपमान सहन करणार नाही. नाना पटोले तुमची टीमकी अशी संताच्या वाणीच्या विरोधात चालणार नाही. ते फादर आणि चद्दरकडे चालू शकते. इकडे चालणार नाही, लक्षात ठेवायचं, अशा इशारी सदावर्ते यांनी दिला.

 

 

 

Tags

follow us