Bageshwar Dham Sarkar: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांनी साधला डाव !
Bageshwar Dham Sarkar: वेगवेगळ्या व्यक्तव्यामुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार ( Bageshwar Dham Sarkar) हे सध्या मुंबईत आहेत. मीरा रोड येथे शनिवारी रात्री त्यांच्या दिव्य दरबार भरला होता. या दिव्य दरबारमध्ये चोरट्यांनी डाव साधला आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक महिलांचे सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. विशेष म्हणजे पोलिसांची कडक सुरक्षा, बाबांचे स्वंयसेवक असताना चोरट्यांनी डाव साधला आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मिरा रोड येथे शनिवारी रात्री दिव्य दरबार सजला होता. बागेश्वर धाम सरकार यांना एेकण्यासाठी हजारो अनुयायांनी गर्दी केली होती. यात महिलांची संख्या जास्त होती. सायंकाळी सुरू झालेला कार्यक्रम रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. हजारो भाविक या कार्यक्रमासाठी आल्याने पोलिसांनी सुरक्षाच्या दृष्टीने बंदोबस्त तैनात केला होता.
हा कार्यक्रम संपल्यानंतर महिला घरी जात होत्या. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी उचलला आहे. अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन व इतर दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दागिने चोरीला गेलेल्या महिलांनी पोलिस ठाण्यात घेऊन गुन्हे नोंदविले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 36 महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
Pandit Dhirendra Krishna Shastri : भारत हा देश हिंदू राष्ट्र बनून राहणार
या सर्व महिलांच्या दागिन्यांची किंमत ही 4 लाख 87 हजार रुपये इतके किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. आता पोलिसांकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. शनिवारनंतर आज रविवारी ही याच ठिकाणी बाबांचा आशीर्वाद आणि विभूती वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
बागेश्वर धाम यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला होता. धाम यांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. परंतु पोलिसांनी धाम यांच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यास नकार देण्यात आला आहे. बागेश्वर धाम यांचा नागपूर येथे कार्यक्रम झाला होता. बागेश्वर धाम सरकार यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त विधान केले आहेत. आता मुंबईत भारत हिंदू राष्ट्र झाले पाहिजे, असे बाबा यांनी म्हटले आहे.