Download App

पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पदोन्नती; नाशिकमध्ये मिळाली मोठी जबाबदारी

Pune Police Joint CP Sandeep Karnik Transferred To Nashik As CP : पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदिप कर्णिक(Sandip Karnik) यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी संदिप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कर्णिक पुण्याचे सहपोलिस आयुक्तपदी विराजमान होते. याबाबत राज्याच्या गृह विभागाच्यावतीने आज आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड पळाला; ललित पाटील प्रकरणी तोंड पोळलेल्या पोलिसांची पुन्हा नाचक्की

कर्णिक यांनी इलेक्‍ट्रॉनिक इंजिनीअरची पदवी प्राप्त केली असून 2004 मध्ये ते भारतीय पोलिस सेवेमध्ये दाखल झाले आहेत. संदीप कर्णिक यांनी आत्तापर्यंत नगर, ठाणे, नागपुर,जालना, नांदेड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध पदांवर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. यासोबतच मुंबईच्या पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

‘निवडणुकीच्या तयारीला लागा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 13 खासदारांना फर्मान…

मागील दिवसांत राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने काल 20 नोव्हेंबर रोजी बदल्यांचे आदेश काढले. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी (Tushar Doshi )यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Rishi Sunak : लोकांना मरू द्या ! पीएम सुनकच्या वक्तव्यानंतर ब्रिटिश खवळले; प्रकरण काय?

पुणे शहरातील काही अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची बदली झाली आहे. त्यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षणाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर अमरावतीचे पोलीस उपायुक्त संभाजी सुदाम कदम यांची पुणे शहर पोलिस उपायुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धुळ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर पुणे लोहमार्गचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांच्यावर अमरावती पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Tags

follow us