साखर तेजीत पण फायदा ऊस उत्पादक व कारखान्यांना किती होईल ? साखर तज्ज्ञाचे स्पष्ट मत

Sugar prices: . गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे 400 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकांसाठी साखर 47 ते 52 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे.

Sugar Price

Sugar Price

Sugar prices hit record highs : राज्यात यावर्षी साखरेचे उत्पादन (Sugar prices) अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे आणि सणासुदीची मागणी वाढल्यामुळे साखरेचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात साखर 50 रुपये किलोवर गेली आहे. याचा फायदा साखर कारखाने किंवा ऊस उत्पादक (Sugarcane Farmers) शेतकऱ्यांना होणार असल्याची चर्चा आहे. मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञांनी हे फेटाळून लावले आहे. सध्या साखर कारखान्यांकडील 80 टक्के साखर विकली गेलेली आहे. उरलेली साखरही एकदम बाहेर काढता येत नाही. त्यामुळे कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना याचा थेट फायदा होणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 ऑगस्ट 2026 पासून व्यापाऱ्यांवर ‘स्टॉक लिमिट’ (साठा मर्यादा) लागू केली आहे. तर दुसरीकडे साखर कारखान्यांनाही मासिक कोटा ठरवून दिला जातो. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात भाव कमी होणार नसले तरी वाढणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे 400 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकांसाठी साखर 47 ते 52 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. घाऊक बाजारात बारीक साखरेचा दर 4,500 रुपये तर मध्यम साखरेचा दर 4600 ते 4750 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या साखरेचा दर सुमारे 4200 ते 4350 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे.

2025-26च्या चालू हंगामाअखेर (सप्टेंबर 2026 पर्यंत) देशात साधारण 43 लाख टन साखरेचा शिल्लक साठा राहण्याचा अंदाज आहे. तो देशाच्या दोन महिन्यांच्या वापरासाठी पुरेसा आहे. देशात यंदा 310 लाख टन उत्पादनाचा अंदाज होता, परंतु ते 275 लाख टनांच्या आसपास मर्यादित राहिले आहे. महाराष्ट्रात सुमारे 99.2 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अपुऱ्या सरकारी मासिक कोट्यामुळे आणि मर्यादित उत्पादनामुळे कारखान्यांकडील साठा वेगाने कमी झाला आहे. कारखान्यांनी त्यांच्या कोट्यातील बहुतांश साखर बाजारात विकली आहे.

साखरेची साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने कडक पावले उचलली आहेत. कोणत्याही साखर व्यापाऱ्याला किंवा डीलरला आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखर साठवून ठेवता येणार नाही. हा नियम नियम 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहिल. शेतकऱ्यांना या दरवाढीचा थेट किंवा त्वरित मोठा फायदा मिळत नाही, कारण उसाचा दर साखरेच्या रोजच्या बाजाराभावावर ठरत नाही. मात्र, पुढील वर्षीच्या एफआरपी ठरविताना याचा फायदा होऊ शकतो.


उत्पादनापैकी 80 टक्के साखरेची विक्री

या संबंधी श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी सांगितले की, साखरेच्या भाववाढीचा साखऱ कारखान्यांना अत्यंत मर्यादित लाभ होणार आहे. त्यामुळे वाढीव दराचा अनावश्यक गवगवा करणे योग्य नाही. केंद्र शासन दर महिन्याला प्रत्येक साखर कारखान्यास साखर विक्रीचा निश्चित कोटा मंजूर करते. त्या कोट्यानुसारच कारखान्यांना साखरेची विक्री करावी लागते. त्यामुळे कोणत्याही कारखान्याला एकाच वेळी संपूर्ण साखर बाजारात विक्री करता येत नाही. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आतापर्यंत त्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 80 टक्के साखरेची विक्री आधीच केलेली आहे. त्यामुळे साखरेच्या सध्याच्या वाढीव बाजारभावाचा लाभ केवळ 20 टक्के शिल्लक साठ्यापुरताच मर्यादित राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version